नमस्कार, कै.ह.भ.प.रामचंद्र पाटलू चौधरी प्राथमिक विद्यामंदिर, वारजे तर्फे आपले आमच्या ब्लॉगवर मन:पूर्वक स्वागत

Thursday, October 7, 2021

वन्यजीव सप्ताह

 वन्यजीव सप्ताह 

( दिनांक : १ ऑक्टोंबर २०२१ ते ७ ऑक्टोंबर २०२१  )


                  वन्यजीव हि आपल्या राष्ट्राची एक संपत्ती आहे. वन्यजीव संपत्तीचे संरक्षण करणे हे प्रत्येक भारतीय नागरिकाचे कर्तव्य आहे. हि जनजागृती व्हावी व मानवाप्रमाणे वन्यजीवांना देखील मुक्त जीवन जगण्याचा अधिकार आहे यासाठी त्यांचे संवर्धन व्हावे म्हणून दरवर्षी १ ऑक्टोंबर ते ७ ऑक्टोंबर या कालावधीत सरकारकडून "वन्यजीव सप्ताह" साजरा केला जातो. 

                 या वर्षी आपण हा सप्ताह  आपल्या whatsapp गृपवर साजरा केला परंतु हि माहिती कायम स्वरूपी आपल्याला कधीही बघण्याची सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून आपण सर्व pdf या आपल्या विद्यालयाच्या ब्लॉगवर पुन्हा प्रकाशित करत आहोत. हि माहिती आपल्याला दि. १ ऑक्टो. ते ७ ऑक्टो. २०२१ या कालावधीत रयत  शिक्षण  संस्थेचे सेवक डॉ.श्री.सुधीर कुंभार सरांनी उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे मनापासून आभार.

                   पहिल्या दिवसापासून ते सातव्या दिवसापर्यंत रोज एक-एक प्राण्याबद्दलची माहिती वाचण्यासाठी व समजून घेण्यासाठी दिलेल्या प्राण्याच्या नावावर  क्लिक करून pdf डाऊनलोडसाठी करून घ्या. 


         दिवस पहिला : आशियाई सिंह                 दिवस दुसरा : चिंकारा         

         दिवस तिसरा : काळवीट                         दिवस चौथा : गवा 

         दिवस पाचवा : चांदी अस्वल                    दिवस सहावा : भारतीय खवले मांजर 

         दिवस सातवा : काळे अस्वल                   

         एकत्रित माहिती : सजीवातील विविधता एक दृष्टिक्षेप

    

संकल्पना : श्रीमती निलिमा प्रकाश गिरमे ( प्र.मुख्याध्यापिका )

कार्यवाही : सर्व शिक्षकवर्ग , म.न.पा.शाळा क्र. 205 B



Friday, October 1, 2021

२ ऑक्टोंबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती

 

            २ ऑक्टोंबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी जयंती 

महात्मा गांधी
Portrait Gandhi.jpg
जन्म
2 अक्टूबर 1869
मृत्यु
30 जनवरी 1948
गाँधी स्मृति
मृत्यु का कारणमानव हत्या बैलिस्टिक आघात
जातीयतागुजराती
नागरिकताब्रिटिश राजभारतीय अधिराज्य,भारत
शिक्षाअल्फ्रेड हाई स्कूल, राजकोट, यूनिवर्सिटी कॉलेज, लन्दन
व्यवसायराजनीतिज्ञबैरिस्टरपत्रकार, दार्शनिक, निबंधकार,संस्मरण लेखक, क्रांतिकारीलेखक
ऊंचाई164 शतिमान
भार164 शतिमान
राजनैतिक पार्टीभारतीय राष्ट्रीय कांग्रेस
धार्मिक मान्यताहिन्दू धर्म
जीवनसाथीकस्तूरबा गांधी
बच्चेहरिलाल मोहनदास गांधीमणिलाल गाँधी,रामदास गांधी, देवदास गांधी
माता-पिताकरमचंद गाँधी पुतलीबाई करमचंद गांधी
हस्ताक्ष
Gandhi signature.svg

Thursday, September 30, 2021

१ ऑक्टोबर - रक्तदान दिन

 


रक्तदान आहे जीवनदान,
ते वाचवते दुसर्याचे प्राण

रक्तदान हे एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने अंगातून रक्त काढून देण्याची क्रिया आहे. असे रक्त रोग्याच्या शरीरात चढवण्यापूर्वी बायोफार्मास्युटिकल प्रक्रियेद्वारे त्याचे विभाजन केले जाते, व संपूर्ण रक्त (Whole Blood) किंवा रक्ताचा आवश्यक तोच घटक रोग्याच्या शरीरात इंजेक्ट केला जातो. रक्त संकलन प्रक्रियेत रक्त बॅंकांचा सहभाग असतो.


बहुतेक रक्तदाते (स्वयंसेवक) स्वखुशीने अणि विनामोबदला रक्तदान करतात. काही देशांमध्ये, रक्ताचा पुरवठा मर्यादित आहे, कारण देणगीदार फक्त नातेवाईकांसाठी किंवा मित्रांसाठीच रक्तदान करतात. अनेक रक्तदाते रक्तदान एक देणगी म्हणून करतात. परंतु ज्या देशांमध्ये रक्त विकण्याची परवानगी आहे तिथे रक्तदात्यांना पैसे मिळतात. रक्तदानासाठी काही ठिकाणी कामकाजावरून मोकळा वेळ दिला जातो.

  • अपघातात झालेला अतिरिक्त रक्तस्राव, पॅलेसोमिया, रक्तक्षय, रक्ताचा कर्करोग, प्रसूतिपश्चात रक्तस्राव, शस्रक्रिया आणि इतर गंभीर आजारांमधे योग्यवेळी रुग्णाला रक्त मिळाले नाही तर तो रुग्ण दगावण्याची शक्यता असते. अशावेळी एका मानवाचेच रक्त दुसऱ्या मानवाचे प्राण वाचवू शकते. कारण मानवाचे रक्त कोणत्याही कारखान्यात तयार होत नाही व दुसऱ्या कोणत्याही प्राण्याचे रक्त मानवासाठी उपयोगात येऊ शकत नाही, त्यामुळे रक्तदानाला अनन्यसाधारण महत्त्व आहे.
  • महाराष्ट्र राज्यात रुग्णांसाठी दरवर्षी सुमारे साडेसात लाख बाटल्या रक्त लागते. ही गरज ७० ते ७५ टक्के पर्यायी बदली रक्तदाता किंवा व्यावसायिक रक्तदात्याकडून भागविली जाते.
  • मानवाच्या शरीरामधे साडेचार ते पाच लिटर रक्त असते. रक्तदानाच्या वेळी केवळ ३०० मिली. रक्त काढले जाते. प्रत्येक रक्तदानानंतर साधारण ३६ तासांमधे शरीरात रक्ताची पातळी पूर्ववत होते. तसेच साधारण २ ते ३ आठवड्यांमधे रक्तपेशीही पूर्ववत होतात. रक्तदान केल्याने कोणताही त्रास किंवा इजा होत नाही.

     ब्लड बॅंकेच्या रेफ्रिजरेटरमध्ये रक्त ४-५ आठवड्यांपर्यंत रक्त सुरक्षित ठेवता येते.

रक्तदानामुळे प्रत्येक वर्षी अनेकांना जीवनदान मिळते. अनेक मोठ्या सर्जरींमध्ये किंवा गंभीर परिस्थितीत रक्तदानामुळे पेशंटचे प्राण वाचण्यास मदत होते. तसेच गरोदरपणात बाळाचे आणि आईचे प्राण वाचण्यास रक्तदान महत्त्वाचे कार्य करते.

  • भारत देशात १२० कोटी लोकसंख्या असूनही केवळ ७४ लाख ते १ कोटी २० लाख लिटर रक्त संकलित होते.
  • रक्त न मिळाल्यामुळे मृत्यूचे प्रमाण देशभरात १५ ते २० टक्के आहे.
  • भारतात केवळ ०.६ टक्के लोक रक्तदान करतात.
  • रक्तदान कोणी, केव्हा व कुठे करावे

    1. वयाच्या १८ वर्षानंतर (६५ वर्षापर्यंत)
    2. वजन ४५ कि.ग्रॅ. च्या वर असल्यास..
    3. रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण कमीत कमी १२.५ ग्रॅम असल्यास
    4. रक्तदाता पूर्णपणे निरोगी असल्यास
    5. निरोगी माणसाला दर ३ महिन्यांनी जवळच्या रक्तपेढीत किंवा कोठेही आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करता येते.


    रक्तदान कोण करू शकत नाहीत

    1. रक्तदात्याने आधीच्या ३ दिवसांत कोणतेही प्रतिजैविक औषध घेतलेले असल्यास.
    2. रक्तदात्याला मागील ३ महिन्यात मलेरिया झाला असल्यास.
    3. रक्तदात्याला मागील १ वर्षात विषमज्वर, कावीळ किंवा श्वानदंश होऊन त्याने रेबीजची लस घेतली असल्यास.
    4. ६ महिन्यापूर्वी त्याची मोठी शस्त्रकिया झाली असल्यास.
    5. गर्भवती महिला, महिलेला १ वर्षाखालील मूल असल्यास किंवा तिचा ६ महिन्यात गर्भपात झाला असल्यास.
    • ब्लड प्रेशर लो किवा हाय असणाऱ्यांनी रक्तदान करताना रक्तदाबाची चाचणी करून पहावी.
    • उपाशीपोटी किवा खाऊन झाल्यावर अर्धा-तासापर्यंत रक्तदान करू नये.
    • इतरही आजारांची चाचणी करून घ्यावी.

    कायमचे बाद रक्तदाते

    • कर्करोग, मधुमेह, हृदयरोग, कावीळ (ब, क प्रकारची), एड्स, मूत्रपिंड रोग, गुप्त रोग, यकृताच्या व्याधी असलेले.

    रक्तदानाचे फायदे

    1. रक्ताची तपासणी होते (एच.आय.व्ही., गुप्त रोग, कावीळ-ब, क प्रकारची, मलेरिया) वजन, तापमान, रक्तदाब व नाडी परीक्षण होते.
    2. रक्तगट व हिमोग्लोबिनच्या प्रमाणाबाबत माहिती मिळते.
    3. बोन मॅरोमध्ये नवीन रक्त तयार करण्याची कार्यक्षमता वाढते.
    4. नवीन तयार झालेल्या रक्तपेशी व रक्तरस यामुळे रोग प्रतिकार शक्ती वाढून शरीरात चैतन्य निर्माण होते.
    5. नियमित रक्तदान केल्याने शरीरातील लोहाचे प्रमाण आवश्यकतेपेक्षा जास्त वाढत नाही. त्यामुळे हृदय-यकृतासारखे अवयव निरोगी राहतात.

Sunday, September 26, 2021

२७ सप्टेंबर - "पर्यटन दिन"

 

म.न.पा. शाळा क्र. 205 (B), वारजे , पुणे 

 २७ सप्टेंबर - "पर्यटन दिन"

पुणे जिल्ह्यातील १० पर्यटन स्थळे बघण्यासाठी खालील लिंकला क्लिक करा.

प्रवास म्हणजे काय?
प्रवास म्हणजे एका जागेपासून दुसऱ्या जागेपर्यंत स्थलांतर करणे किंवा जाणे. इतकी साधी-सरळ प्रवासाची व्याख्या होईल. तर मग पर्यटन म्हणजे नक्की काय? परंतु पर्यटनाची व्याख्या थोडी विस्तृत (broader) आहे.

पर्यटनाची व्याख्या?
जागतिक पर्यटन संस्थांच्या व्याख्येप्रमाणे – ‘चोवीस तासापेक्षा अधिक व एक वर्षापेक्षा कमी काळ, घर व कामाची जागा सोडून इतर जागी राहणे, तेथील दृश्ये पाहणे आणि आनंद लुटणे म्हणजे पर्यटन’. अशी औपचारिक (formal) व्याख्या करायला गेल्यास ती अधिकच क्लिष्ट होत जाईल म्हणून मी आपल्या सोप्या मराठी भाषेत सांगायचा प्रयत्न करेन.

पर्यटन म्हणजे काय?
“एकटे किंवा समूहाने, घर आणि कामाच्या जागे व्यतिरिक्त दूर राहून तेथील गोष्टींचा आनंद घेणे व वापर करणे, तेथंपर्यंत प्रवास करणे, तेथील खाणं-पिणं-राहणं, मनोरंजन, खरेदी, तेथील स्थानिकांशी संवाद-भेटीगाठी घेणं, तसेच यामध्ये समाविष्ट असणाऱ्या सर्व घटना, आपण केलेलं नियोजन व आपली योजना, संपर्कात येणाऱ्या संस्था व उद्योग, या सर्वांच्या एकूण सहभाग व समावेशातून आपल्याला मिळणारा अनुभव (experience) किंवा अनुभवांची शृंखला म्हणजे पर्यटन.“

पर्यटनाची नक्की सुरुवात कोठून होते आणि कुठे संपते हे सांगणे तसे अवगड आहे. परंतु सर्वसाधारणपणे, आपल्या मनात एखाद्या जागेविषयी/दृश्याविषयी आवड निर्माण होते, तेथूनच खरी पर्यटनाची सुरुवात होते आणि तेथे जाऊन तो अनुभव घेऊन येईपर्यंत पर्यटन सुरूच असते. फेसबुकवर मित्र किंवा मैत्रिणीने टाकलेला एखादा फोटो असेल, चित्रपटातील एखादे दृश्य असेल किंवा वर्तमानपत्रातील एखादे लेखन असेल, ते पाहून-वाचून आपल्यालाही त्या जागी जाऊन येण्याची, ते सौंदर्य दृश्य प्रत्यक्ष पाहण्याची सुप्त इच्छा मनामध्ये जागृत होते. ती इच्छाच पर्यटनाची सुरुवात असते. त्या इच्छेने आपण त्याबद्दल अधिक माहिती गोळा करायला सुरुवात करतो. मग तिथे पोहोचण्यासाठी बजेट व सोयीचा रस्ता व वाहतूक यांची निवड करतो. तेथे राहण्याची सोय करतो. आपण प्रत्यक्ष तेथे जाऊन त्या गोष्टीचा अनुभव घेऊन येतो आणि तो अनुभव मित्र-मैत्रिणींशी प्रत्यक्षात किंवा सोशल मेडिया मध्ये शेअर करतो. ते पाहून इतरांच्या मनामध्ये सुद्धा तो अनुभव घेण्याची इच्छा जागृत होते.

एकंदरीत प्रवास व पर्यटनासाठी एखादी प्रेरणा (motivation), हेतू, उद्देश किंवा निश्चय असणे गरजेचे आहे. कृषी पर्यटन आणि शाश्वत पर्यटन यासारख्या पर्यटनामागे ही जसा वेगळा उद्देश असतो त्याप्रमाणे प्रत्येक पर्यटनामागे वेगवेगळे हेतू असतो. या प्रेरणा किंवा उद्देशानुसार पर्यटनाचे अनेक वेगवेगळे प्रकार पडतात. सण-समारंभासाठी गावी जाणे असो किंवा कार्यासाठी/दर्शनासाठी एखाद्या धार्मिक ठिकाणी जाणे असो, कामानिमित्त बाहेरगावी-परदेशी जाणे असो किंवा दवाखान्यासाठी घरापासून दूर जाणे असो, हे सर्व पर्यटनाचाच भाग आहेत.

Tuesday, September 21, 2021

थोर शिक्षण तपस्वी- रयतेचा वाली : पद्मभूषण कर्मवीर डॉ. भाऊराव पाटील


२२ सप्टेंबर - पदमभूषण डॉ. कर्मवीर  भाऊराव पाटील  




कर्मवीर भाऊराव पाटील (सप्टेंबर २२, इ.स. १८८७; कुंभोज, महाराष्ट्र - मे ९, इ.स. १९५९) हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षणप्रसारक होते. सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणप्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली. भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून 'कमवा व शिका' हे कल्पना स्वीकारून मोठे काम केले. ते जोतिबा फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते. त्यांचा भारतीय स्वातंत्र्यलढ्यातही सहभाग होता.

भाऊराव पाटील   : 

जन्म: सप्टेंबर २२, इ.स. १८८७

कुंभोज, महाराष्ट्र

मृत्यू : मे ९, इ.स. १९५९

टोपण नावे : कर्मवीर

रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक भाऊराव पाटील यांचा जन्म कोल्हापूर जिल्ह्यातील कुंभोज या गावी जैन कुटूंबात झाला. सांगली जिल्ह्यातील ऐतवडे बुद्रुक हे त्यांचे मूळ गाव होय. लहानपणापासूनच भाऊराव बंडखोर होते. अन्यायाची त्यांना प्रचंड चीड होती. अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता. अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता. त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा या गावी झाले. पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले. त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती. याच काळात त्यांच्यावर राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला.रयत शिक्षण संस्था संपादन करा

पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले. याच काळात त्यांनी मदवानमास्तर, भाऊसाहेब कुदळे, नानासाहेब येडेकर आदि मंडळींबरोबर दुधगावात ‘दुधगाव शिक्षण मंडळ’ स्थापन केले. याच संस्थेमार्फत सर्व जातिधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले. रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले. पुढे त्यांनी ओगल्यांच्या काच कारखान्यात व किर्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले. याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला.


दिनांक ऑक्टोबर ४, इ.स. १९१९ रोजी भाऊराव पाटील यांनी ‘रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली. डॉक्टर नागनाथअण्णा नायकवडी यानी रयत शिक्षण संस्थेला १,११,१११ रुपयांची देणगी दिली. पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले. संस्थेची काही अशी उद्दिष्टे होती -


शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे.

मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे.

निरनिराळ्या जातिधर्मातील विद्यार्थ्यांत प्रेमभाव निर्माण करणे.

अयोग्य रूढींना फाटा देऊन खर्‍या विकासाचे वळण लावणे.

संघशक्तीचे महत्त्व जरूर तर कृतीने पटवून देणे.

सर्व मुले काटकसरी, स्वावलंबी, शीलवान व उत्साही बनवण्याचा प्रयत्न करणे.

बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे.

ही उद्दिष्टे साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे, तर समता, बंधुता, श्रमप्रतिष्ठा, सामाजिक बांधिलकी आदि मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांना दिली.


साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले. हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांच्या पत्नीस स्वतःचे मंगळसूत्र व दागिनेही विकावे लागले. अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृहे व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला. या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली. २५ फेब्रुवारी, इ.स. १९२७ रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे ‘श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाउस’ असे नामाभिधान केले गेले. महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक ५०० रुपयांची मदत सुरू केली. जून १६, इ.स. १९३५ रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत (रजिस्टर) झाली. याच साली साताऱ्यात भाऊरावांनी ‘सिल्व्हर ज्युबिली ट्रेनिंग कॉलेज’ सुरू केले.


भाऊरावांनी देशातले ‘कमवा आणि शिका’ या पद्धतीने चालणारे पहिले ‘फ्री ॲन्ड रेसिडेन्शियल हायस्कूल’ सातारा येथेच सुरू केले आणि त्याला नाव दिले ‘महाराजा सयाजीराव हायस्कूल’. यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली. इ.स. १९४७ साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात ‘छत्रपती शिवाजी कॉलेज’ची, तर इ.स. १९५४ साली कऱ्हाड येथे ‘सद्गुरू गाडगे महाराज कॉलेज‘ची स्थापना केली. शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे इ.स. १९५५ मध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने ‘आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन’ सुरू केले. या सर्व शाळांच्या, महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती. त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो. महात्मा फुले यांना गुरू मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले. ‘प्रत्येक गावात शाळा’; ‘बहुजन समाजातील शिक्षक’ व ‘शिक्षक प्रशिक्षण’ - या सूत्रांचा त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला.महाराष्टाच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला. तसेच भारतीय केंद्रशासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरवले. पुणे विद्यापीठाने त्यांचा इसवी सन १९५९मध्ये सन्माननीय डी. लिट. ही पदवी दिली होती.[१] श्री. ह. रा. महाजनी यांनी ‘महाराष्ट्राचे बुकर टी. वॉशिंग्टन’ या यथार्थ शब्दांत कर्मवीरांचे वर्णन केले आहे. सातारा येथे कर्मवीरांचे समाधिस्थान व कर्मवीर स्मृतिभवन आहे. तेथे भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत. अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत ९ मे, इ.स. १९५९ रोजी मालवल


रयतगीत 


रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. वटवृक्षाच्या विशालतेचा मोह नभाला पडतो आहे. || धृ ||


कर्मवीरांचे ज्ञान पीठ हे शक्तीपीठ हे ठरते आहे. शाहू-फुल्यांचे समानतेचे तत्व मानसी मुरते आहे. धर्म जातीच्या पार गांधींचे मूल्य मानवी जपतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे.|| १ ||


गरिबांसाठी लेणी मोडून , लक्ष्मी वाहिनी झाली आई. कमवा आणि शिका मंत्र हा तरुणाईला प्रेरक होई. स्वावलंबी वृत्ती ठेऊनि, ज्ञानसाधना करतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. || २||


दिन-दलितांसाठी आण्णा तुमची झिजली चंदन काया अनाथ जीवा सदा लाभली मातृ हृदयी तुमची माया. शून्या मधुनी नवसृष्टीचा निर्मिक तोही ठरतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||३||


जीवनातला तिमिर जावा, प्रबोधनाची पहाट व्हावी, इथे लाभले पंख लेवुनी उंच भरारी नभात घ्यावी प्रतिभाशाली बहुजनांचा वेलू गगनी चढतो आहे. रयते मधुनी नव्या युगाचा माणूस आता घडतो आहे. ||४|| ... 

गीतकार - विठ्ठल वाघ

Thursday, September 16, 2021

 

 "फिट इंडिया" 

   शारीरिक शिक्षणांतर्गत  विद्यालयास  मिळालेले "फिट इंडिया"  रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट








म.न.पा. शाळा क्रमांक २०५ (B), वारजे पुणे 


 १६ सप्टेंबर "जागतिक ओझोन दिन"

                     फ्रीज, एअरकंडिशनर आणि इतर यंत्रणात वापरल्या जाणा-या क्लोरोफ्लुरोकार्बन प्रकारच्या रसायनांमुळे

 पृथ्वीभोवतालच्या ओझोन वायूच्या ठरला छिद्रे पडत असल्याचे दिसले. यामुळे सूर्यप्रकाशातील अतिनील प्रारण

(अल्ट्राव्हायोलेट रेडिएशन) पृथ्वीपर्यंत घातक प्रमाणात पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली. या प्रारणाचे प्रमाण

 वाढल्याने पृथ्वीचे तापमान वाढून हवामानात मोठे बदल होऊ शकतात. संपूर्ण जीवसृष्टीच धोक्यात येऊ शकते !

मूळ संकल्पना व सुरुवात

        संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरण कार्यक्रमानुसार (UNEP) १९९५ सालापासून हा दिवस पाळला जातो. १९७८ साली

 कॅनडातल्या मॉन्ट्रिअल शहरातील परिषदेमध्ये रसायनांमुळे ओझोनच्या थरावर होणा-या दुष्परिणामांबाबत उपाय

 करण्यासाठी अनेक देशांनी सहमती दर्शवली. हा करार पर्यावरण रक्षणाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

 कारण रसायनांतील बदलांसाठी २०१० आणि २०३० या कालमर्यादा ठरल्या व त्या पाळल्या जात आहेत.

अधिक माहिती

         खरेतर चंगळवादाने सर्व पृथ्वीला संकटात टाकल्याचे हे आणखी एक उदाहरण होय. विकसनशील देशांनी वस्तू

 वापरण्यापूर्वी त्यांच्या पर्यावरणीय परिणामांचा विचार करावा ही अपेक्षा. तसेच हरितगृह- वायूंच्या प्रमाणावर नियंत्रण

 आणणारा क्योटो करारही यशस्वी ठरेल अशी आशा आहे. सध्या ऐवजी हायड्रोक्लोरोफ्लुरोकार्बन आणि

 हायड्रोफ्लुरोकार्बन चा वापर सुरु झाला आहे. परंतु यावरही २०३० पूर्वी नियंत्रण आणायचे आहे.

अधिक माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा व pdf डाऊनलोड करा.

 

https://drive.google.com/file/d/1ijjFCM8r1ZXJt7JyLTuP8hJz_AtMy2FN/view?usp=sharing

                                                                                                            प्र. मुख्याध्यापिका 

                                                                                                         श्रीमती निलिमा गिरमे 


जागतिक ओझोन दिन १६ सप्टेंबर